काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते विविध वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत कारण त्यांचं नवं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विहिंपने टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. भाजपानंतर आणि नरेंद्र मोदींनंतर आता राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. इजिप्तमधली कट्टर संघटना मुस्लीम ब्रदरहुडसोबत राहुल गांधींनी संघाची तुलना केली आहे. संघाची स्थापन अशा पद्धतीने करण्यात आली आहे जशा पद्धतीने इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड स्थापन झालं होतं. लंडनमधल्या थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी हे उदाहरण दिलं आहे. RSS ही कट्टर आणि फॅसिस्टवादी संघटना आहे. या संघटनेने भारतातल्या काही संस्थांवरही कब्जा केला आहे. ज्याप्रमाणे इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड आहे त्याप्रमाणे भारतात RSS आहे. भारतात या संघटनेकडून असा प्रचार केला जातो आहे की भाजपाला कुणी हरवू शकत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rahul gandhi attacks rashriya swayamsevak sangh again in london scj
First published on: 07-03-2023 at 16:01 IST