देशभरामध्ये इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली. काँग्रेसच्या या बंदला २१ विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होती. त्यामुळेच अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत आणि बिहारपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत होते. यामध्ये इंधन दरवाढ मागे घेण्याबरोबरच राजकीय घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र काही ठिकाणी या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरुद्ध अर्थाच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ भाजपनेच आपल्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने काँग्रेसचे आंदोलन संपल्यानंतर ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ आणि ‘राहुल गांधी मुर्दाबा’च्या घोषणा दिल्याचे दिसत आहे. दोन वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून भाजपने काँग्रेच्या आजच्या आंदोलनात मोदींचा जयघोष झाल्याचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भाजपने, काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात, राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा असे ट्विट केले आहे. या व्हिडीओला तासाभरात दहा हजारहून अधिक लाईक्स आणि हजारो रिट्विटस मिळाले आहेत.

विशेष म्हणजे भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. लोकसभा आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे दोन्ही प्रमुख पक्षांचे आयटी सेल्स अॅक्टीव्ह झाल्याचे दिसून येत आहे. ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही फ्रण्टवर देशातील प्रमुख पक्ष निडवणुका लढवणार असे चित्र आत्तापासूनच दिसू लागले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress slogan for bharat bandh rahul gandhi murdabad narendra modi zindabad
First published on: 10-09-2018 at 17:33 IST