राजस्थानातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. अशातच माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध नव्याने आघाडी उघडली आहे. भाजपाच्या राजवटीतील कथित भ्रष्टाचाराबद्दल गेहलोत सरकारने कारवाई करावी, या मागणी सचिन पायलट यांनी आज ( ११ एप्रिल ) लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. यावरून राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, पालयट यांचे उपोषण पक्षविरोधी कृती आहे, असे रंधावा यांनी म्हटलं.

सुखजिंदर सिंह रंधावा ट्विट करत म्हणाले, “सचिन पायलट उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा का उपस्थित केला नाही? माझ्याशी भेटल्यावर कधीही यावर चर्चा केली नाही. काही अडचण होती, तर बोलायचे होते. पण, पक्षीय स्तरावर चर्चा करण्याऐवजी थेट उपोषणाला बसणे चुकीचे आहे.”

हेही वाचा : अदाणींच्या कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक कुणी केली? राहुल गांधींच्या आरोपांवर अदाणी समूहाचा खुलासा

सचिन पायलट यांच्या उपोषणाविरोधात रंधावा यांनी निवेदन जारी करत सांगितले, “सचिन पायलट यांचे उपोषण पक्षविरोधी कृती आहे. जर, त्यांना आपल्या सरकारच्या कामाबद्दल काही अडचण होती, तर माध्यमांत जाण्याऐवजी पक्षीय बैठकीत मुद्दा मांडायला हवा होता. गेल्या पाच महिन्यांपासून मी राजस्थानचा प्रभारी आहे. मात्र, पायलट यांनी कधी या समस्यांवर चर्चा नाही केली. मी त्यांच्या संपर्कात असून, विनम्रपणे संवाद साधण्याचे आवाहन करतो. कारण, ते काँग्रेस पक्षाची संपत्ती आहेत.”

हेही वाचा : भारतीय भूमीवर अतिक्रमण करण्याचा काळ सरला; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेस भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. सचिन पायलट यांनी माझ्याशी बोलायला हवे होते. याप्रकरणी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरही कारवाई नाही झाली, तर पालयट यांना उपोषण करण्याचा अधिकार होता. परंतु, पक्षीय स्तरावर चर्चा न करता, थेट उपोषणाला बसणे योग्य नाही,” असेही रंधावा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.