पीटीआय, नवी दिल्ली

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला असला तरी राज्यातील सुखविंदरसिंह सुक्खू यांचे सरकार वाचविण्यात काँग्रेसला यश आले आहे. सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न अयशस्वी ठरले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पक्षनिरीक्षक आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. दुसरीकडे पराभवाची जबाबदारी सुक्खू यांनी स्वीकारली असून काँग्रेसविरोधात मतदान करणाऱ्या सहा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले आहे.

Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
fear of defeat, Congress senior leaders, contest lok sabha election 2024
पराभवाच्या भीतीने काँग्रेसच्या वरिष्ठांचा लोकसभा निवडणुकीत काढता पाय
Taranjit singh sandhu joins bjp
माजी राजदूतांच्या भाजपा प्रवेशाने आप-काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? कोण आहेत तरनजीत सिंग संधू?

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशची कमळ मोहीम अयशस्वी; निरीक्षकांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसमधील मतभेद दूर

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असतानाही राज्यसभा निवडणुकीत सिंघवी यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यात ‘कमळ मोहीम’ सुरू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने शिवकुमार यांच्यासह छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि भूपेंदर हुडा यांना सिमल्याला पाठविले. त्यांनी सुक्खू यांच्यासह सर्व आमदारांशी चर्चा केली व वादावर पडदा टाकला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले, की इतर राज्यांप्रमाणेच भाजपने हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी पैशाची शक्ती, केंद्र सरकार आणि राजकीय बळ यांचा वापर करण्याचा खेळ सुरू केला होता, परंतु तो अपयशी ठरला आहे.

बंडखोर आमदार अपात्र

राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी मतदान करणाऱ्या सहा काँग्रेस आमदारांना हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी गुरुवारी अपात्र ठरविले. वित्त विधेयकावर सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी असलेला पक्षादेश झुगारून हे आमदार सभागृहात गैरहजर राहिले होते.

प्रियांका गांधींची महत्त्वपूर्ण भूमिका

हिमाचल प्रदेश सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी मतदान झाल्यानंतर त्या दक्ष झाल्या आणि त्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात राहिल्या. बंडखोरीचे संकेत मिळाल्यानंतर प्रियांका यांनी तात्काळ सक्रिय होऊन पुढाकार घेतला आणि निरीक्षकांना सिमल्यात पाठविल्याचे समजते.

अभिषेक मनु सिंघवी यांच्या पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री, आमदार आणि प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्याची चर्चा केल्यानंतर सर्व मतभेद दूर झाले आहेत. – डी. के. शिवकुमार, काँग्रेस पक्षनिरीक्षक