२००९ मध्ये गुजरातमधील एका वास्तुरचनाकार महिलेवर पाळत ठेवल्याचा ‘कोब्रा पोस्ट’च्या आरोपानंतर काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. या महिलेला तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून सुरक्षा पुरवली, असा दावा भाजप करत आहे, तर मग तिला सुरक्षा अधिकारी का दिला नाही, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांनी ‘साहेबांच्या’ आदेशावरून या महिलेवर पाळत ठेवण्यास सांगितले होते, असा दावा ‘कोब्रा पोस्ट’ व ‘गुलेल’ या दोन पोर्टलनी केला होता. त्यांनी शहा व आयपीएस अधिकारी यांच्या संवादाच्या टेप उघड केल्या असून त्याची शहानिशा झालेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
संबंधित महिलेला सुरक्षा अधिकारी का नाही?
२००९ मध्ये गुजरातमधील एका वास्तुरचनाकार महिलेवर पाळत ठेवल्याचा ‘कोब्रा पोस्ट’च्या आरोपानंतर काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे.
First published on: 19-11-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress targets modi over gujarat snooping row as war of words escalates