Sukesh Chandrashekhar: तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर यांनी आधी दिल्लीचे उपराज्यपाल यांना पत्र लिहून आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले. आता सुकेशने आपले वकील अशोक सिंह यांच्या मार्फत लेटर बॉम्ब टाकत थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाच आव्हान दिलंय. “माझ्यावर केलेल्या आरोपांसाठी माझी पॉलीग्राफ चाचणी करण्याची तयार आहे. अरविंद केजरीवालांनीही ही चाचणी करण्याची हिंमत दाखवावी,” असं खुलं आव्हान सुकेशने दिलंय. याशिवाय सुकेशने पैसे देऊन दिल्लीतील शाळांच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये छापून आणल्याचाही आरोप केलाय.

सुकेशने अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन दोघांना पॉलीग्राफ चाचणी करण्याचं आव्हान दिलंय. सुकेश म्हणाला, “माझ्यावर केलेल्या आरोपांसाठी माझी पॉलीग्राफ चाचणी करण्याची तयार आहे. अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन दोघांनी पॉलीग्राफ चाचणीची हिंमत दाखवावी. तिघेही एकाचवेळी ही चाचणी करू. या चाचणीचं थेट प्रक्षेपण करायला हवं, म्हणजे केजरीवाल आणि जैन यांचं सत्य देशासमोर येईल.”

“पैसा देऊन ‘पेड न्यूज’ छापल्या”

सुकेश चंद्रशेखरने आरोप केला, “ओळखीच्या पीआर एजंटच्या माध्यमातून पैसे देऊन दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आणि टाइम्स मॅगझीनमध्ये ‘पेड न्यूज’ छापण्यात आल्या. या पेड न्यूज संबंधित वृत्तपत्रांचे पीआर एजंट मार्क आणि वेरोनिका यांना आठ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर देऊन या बातम्या छापण्यात आल्या.”

हेही वाचा : “…तर मग तुम्ही जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? कोट्यवधी रुपये कुठे गेले”? कोर्टाचा ईडीला सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यासाठी विदेशातून कोट्यावधी रुपयांचं घड्याळ मागवून त्यांना भेट दिल्याचाही गंभीर आरोप सुकेश चंद्रशेखरने केलाय.