देशात आजही ४० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४२ हजार ७६६ रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३०८ रुग्ण दगावले आहेत. नव्या बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २९ लाख ८८ हजार ६७३ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ४० हजार ५३३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत ३८ हजार ९१ करोनातून बरे झाले असून आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ३८ हजार ९२ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात सध्या ४ लाख १० हजार ४८ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. रिकव्हरी रेट सध्या ९७.४२ आहे. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.६२ टक्क्यांवर असून हा रेट गेल्या ७२ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

तर डेली पॉझिटीव्हीटी रेट २.४५ टक्क्यांवर आहे. दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६८.४६ कोटी लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रातील परिस्थिती..

राज्यात ४ हजार १३० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ५०६ जण करोनामुक्त झाले आहेत. शिवाय, ६४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे.