देशभरात करोनाची तिसरी लाट ओसरल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या २४ तासांत देशात २० हजारांपेक्षाही कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात देशभरात करोनाचे एकूण १६,०५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या १९.६ टक्क्यांनी कमी आहेत. तसेच रविवारी एकूण २०६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देशभरातील आतापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या ४ कोटी, २८ लाख, ३८ हजार ५२४ झाली आहे. तर आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण ५ लाख १२ हजार १०९ लोकांना जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २ लाख,२ हजार १३१वर आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर ९८.३३ टक्के झाला आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३७ हजार ९०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशभरात आतापर्यंत एकूण ४ कोटी, २१ लाख, २४ हजार, २८४ लोकांनी करोनावर मात केली आहे.