नवी दिल्ली : भारतात करोनाचे नव्याने ३९,७४२ रुग्ण सापडले असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३ कोटी १३ लाख ७१ हजार ९०१ झाली आहे. ५३५ जण नव्याने मरण पावल्याने एकूण मृतांची संख्या ४ लाख २० हजार २२१ झाली आहे, असे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली असून ती ४ लाख ८ हजार २१२ झाली आहे. तसेच एकूण संसर्ग दर १.३० टक्के झाला आहे. बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा ९७.३६ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात ७६५ नवीन रु ग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ७ ऑगस्टला २० लाख, २३ ऑगस्टला ३० लाख, ५ सप्टेंबरला ४० लाख, १६ सप्टेंबरला  ५० लाख तर २८ सप्टेंबरला ६० लाखांवर गेली. ११ ऑक्टोबरला ती ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख , २० नोव्हेंबरला ९० लाख, १९ डिसेंबरला १ कोटी झाली होती. ४ मे रोजी भारताने दोन कोटींचा, तर २३ जूनला ३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी एकूण १७ लाख १८ हजार ७५६ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४५ कोटी ६२ लाख ८९ हजार ५६७ चाचण्या झाल्या आहेत. दैनंदिन सकारात्मकता दर २.३१ टक्के राहिला असून तो लागोपाठ ३४ व्या दिवशी तीन टक्क््यांपेक्षा कमी होता.

साप्ताहिक सकारात्मकता दर २.२४ टक्के इतका नोंदला गेला. बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी ५ लाख ४३ हजार १३८ झाली आहे, तर मृत्यू दर १.३४ टक्के आहे. आतापर्यंत ४३.३१ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात नव्याने २२४ बळी गेले, तर केरळात ९८ जण मरण पावले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक १ लाख ३१ हजार ४२९ बळी गेले आहेत. कर्नाटकात ३६३५३, तमिळनाडूत ३३८८९, दिल्लीत २५०४१, उत्तर प्रदेशात २२७४९, पश्चिम बंगाल १८०६४ या प्रमाणे बळी गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सत्तर टक्के बळी सहआजाराचे आहेत.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient corona test akp
First published on: 26-07-2021 at 00:30 IST