scorecardresearch

‘ओमायक्रॉन’वर वर्धक मात्रा प्रभावशाली; ‘द लॅन्सेट जर्नल’चा अहवाल

इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्था (एनआयएचआर) आणि फ्रान्सिस क्रिक संस्था यांच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘द लॅन्सेट जर्नल’चा अहवाल

करोना प्रतिबंधक तिसरी मात्रा (वर्धक मात्रा) ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूशी लढा देण्यात उपयुक्त असल्याची माहिती ‘द लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. वर्धक मात्रेमुळे प्रतिपिंडे तयार होत असून ओमायक्रॉनला निष्प्रभ करण्यात ही प्रतिपिंडे प्रभावशाली असल्याचे दिसून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्था (एनआयएचआर) आणि फ्रान्सिस क्रिक संस्था यांच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. वर्धक मात्रा घेतलेल्यांचा अभ्यास या संशोधकांनी केला. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि पीफायझर लशीची वर्धक मात्रा घेतलेल्यांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांच्या असे लक्षात आले की, वर्धक मात्रा घेतल्यानंतर या लाभार्थ्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाली आहेत. ही प्रतिपिंडे ओमायक्रॉनसह अल्फा आणि डेल्टा विषाणूंना निष्प्रभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

करोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर तीन महिन्यांनी प्रतिपिडांचा स्तर खाली आलेला असतो, मात्र वर्धक मात्रेनंतर हा स्तर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले. तिसरी मात्रा घेतल्यानंतर प्रर्तिंपडांचा स्तर पहिल्या दोन मात्रांपेक्षा २.५ पटीने वाढतो. ओमायक्रॉनशी लढा देण्यास हा स्तर उपयुक्त आहे, असे संशोधकांनी सांगितले.

देशात ३,१७,५३२ नवे करोनाबाधित

’ गेल्या २४ तासांत देशात ३,१७,५३२ जणांना करोनाचा संसर्ग झाला. गेल्या २४९ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

’ यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,८२,१८,७७३ इतकी झाली असून यात ९२८७ ओमायक्रॉनग्रस्तांचा समावेश आहे.

’ उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून १९,२४,०५१ झाली असून, ती २३४ दिवसांतील सर्वाधिक आहे.

’ गुरुवारी दिवसभरात ४९१ लोकांचा करोनाने मृत्यू झाल्यामुळे करोना मृत्यूचा एकूण आकडा ४,८७,६९३ इतका झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

’ बुधवारपासून ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये ३.६३ टक्के वाढ झाल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona restriction omicron virus nihr astrazeneca pfizer vaccine akp