करोना प्रतिबंधासाठी सहा फुटांचे अंतर अपुरे!

‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज’ या नियतकालिकात म्हटले आहे, की शारीरिक किंवा सामाजिक अंतर हे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा घटक नाही.

Coronavirus destroy Brazilian viper venom study claims

करोना प्रतिबंधासाठी साडेसहा फूट म्हणजे दोन मीटर अंतर पुरेसे नसल्याचे एका अभ्यासात म्हटले आहे. करोनाचा विषाणू हवेतील कणातून पसरतो त्यामुळे बंदिस्त खोल्यांमध्ये तो जास्त पसरला जाऊ शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज’ या नियतकालिकात म्हटले आहे, की शारीरिक किंवा सामाजिक अंतर हे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा घटक नाही. त्यासाठी मुखपट्टीचा वापर हाच जास्त प्रभावी उपाय ठरू शकतो. संशोधकांनी यात तीन घटकांचा विचार केला असून त्यात म्हटले आहे, की हवेतील कण वेगाने पसरतात व त्यामाध्यमातून करोनाचा विषाणू पसरू शकतो. त्यासाठी हवेशीर जागा असणे गरजेचे आहे. बोलताना किंवा श्वास सोडताना करोनाचा विषाणू बाहेर पडू शकतो. यात १ ते १० मायक्रोमीटर कणांचा अभ्यास श्वासोच्छवासाच्या दृष्टिकोनातून करण्यात आला. ट्रेसर गॅसच्या मदतीने हवाई बंदिस्त ठिकाणी चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ ते १० मायक्रोमीटर या टप्प्यातील कणांमधून करोनाचा विषाणू पसरू शकतो असे दिसून आले.

अमेरिकेतील पेनसिल्वेनिया विद्यापीठातील विद्यार्थी व शोधनिबंधाचे प्रमुख लेखक जेन पेई यांनी म्हटले आहे, की हवेतील कणांवर स्वार होऊन विषाणू पसरू शकतो. आम्ही इमारतींमधील हवेशीरपणा व शारीरिक अंतर यांचाही तुलनात्मक अभ्यास विषाणू प्रसाराबाबत केला आहे. मुखपट्टीशिवाय बोलताना एखाद्या व्यक्तीच्या तोंडातील विषाणूचे कण एका व्यक्तीकडून दुसरीकडे  श्वासामार्फत पसरू शकतात. कमी हवेशीर असलेल्या खोल्यांमध्ये विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते, असे पेन स्टेटचे सहायक प्राध्यापक डॉनग्युन रिम यांनी म्हटले आहे.

सार्स सीओव्ही २ म्हणजे कोविड विषाणूचा ‘म्यू’ किंवा  सी.१.२ विषाणू प्रकार भारतात सापडलेला नाही. डेल्टा विषाणू मात्र देशासाठी अजूनही चिंतेची बाब आहे असे जनुकीय क्रमवारी उलगडणाऱ्या ‘इन्साकॉग’ या संस्थेने म्हटले आहे. दहा हून अधिक प्रयोगशाळा या संस्थेअंतर्गत विषाणूची जनुकीय क्रमवारी उलगडण्याचे काम करीत आहेत. बिटा विषाणू प्रमाणेच हा विषाणू अजून फारसा अभ्यासला गेलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection six feet is not enough for a corona virus ban akp