अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. अमेरिकेकडून WHO ला होणारा निधीचा पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. करोना व्हायरसचा जगभरात फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल भूमिका घेतली, असा ट्रम्प यांचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

WHO ला अमेरिकेकडून निधीचा पुरवठा केला जातो, त्यावर नियंत्रण आणणार असल्याचे ट्रम्प पत्रकारांना म्हणाले. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळतो. ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा संयुक्त राष्ट्र आणि अन्य संस्थांवर टीका केली आहे.

WHO ला दिला जाणारा निधी कसा रोखणार त्याबद्दल त्यांनी कुठलीही सविस्तर माहिती दिली नाही. पण त्याच पत्रकार परिषदेत काही मिनिटात ट्रम्प म्हणाले की, “मी असे करणार, हे मी म्हटलेले नाही. निधी पुरवठा बंद करण्यााच विचार करु असे मला म्हणायचे आहे.”

WHO चा कारभार चीन केंद्रीत असल्याचा आरोपही याआधी ट्रम्प यांनी टि्वटरवरुन केला होता. अमेरिकेत चीनवर खासकरुन रिपब्लिकन पक्षाकडून मोठया प्रमाणावर टीक सुरु आहे. चीनने करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आणि मृतांच्या आकडयाबद्दल जी माहिती दिलीय, त्यावरही ट्रम्प यांनी शंक उपस्थित केली आहे. ट्रम्प यांनी देखील वेळीच उपायोजना न केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मोठया प्रमाणावर टीका सुरु आहे. आधी त्यांनी अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. नंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. Covid-19 मुळे अमेरिकेत १२ हजार पेक्षा जास्त नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus donald trump accuses who of bias toward china threatens to put hold on us funding dmp
First published on: 08-04-2020 at 11:50 IST