इक्वॅडोर देशामध्ये एका विचित्र दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये सेक्स करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका प्रेमी युगुलाचा मृत्यू झाला आहे. क्विटो शहरामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये एक २८ वर्षीय महिला आणि ३५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या २८ वर्षीय महिलेने तिच्या घरी जवळच्या मित्रांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी संपल्यानंतर  ही महिला आणि तिचा ३५ वर्षीय प्रियकर घराच्या बाल्कनीमध्ये जाऊन सेक्स करु लागले. मात्र यादरम्यान दोघांचा तोल गेला आणि ते तिसऱ्या मजल्यावरुन नग्न अवस्थेमध्येच थेट खाली पडले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

काहीतरी पडल्याचा जोरात आवाज झाल्याने इमरतीमधील रहिवाशी बाहेर आल्यानंतर त्यांना या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे अढळले. या प्रकरणाची चौकशी पोलीस खात्याचे गुप्तहेर करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सेक्स करण्याच्या नादात आपण कुठे आहोत याचे भान न राहिल्याने या दोघांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मरण पावलेल्या महिलेची आठ वर्षांची मुलगी आहे असं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

अशाप्रकारे सेक्स करताना पडून मृत्यू होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही दक्षिण लंडनमधील एका रहिवाशी इमारतीमध्ये बाल्कनीत सेक्स करताना तोल जाऊन खाली पडल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा आणि १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता.