देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर जगभरात त्याच्यावर परिणामकारक ठरणारी लस आणि औषधीचा शोधाला सुरूवात झाली. लस विकसित झाली. याच काळात बाबा रामदेव यांच्या पंतजलि योगपीठाने करोनावर परिणामकारक औषध शोधल्याचा दावा केला. हे औषध केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थिती बाजारातही आलं. मात्र, बाजारात आलेल्या कोरोनील किटवरून बराच वादंगही निर्माण झालं. मात्र केंद्राने अद्यापही कोरोनीलचा समावेश कोविड उपचार औषधांच्या यादीत केलेला नाही. तर दुसरीकडे अनेक राज्यात कोरोनील किट वाटलं जात आहे. या सगळ्या वादावर बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

देश करोना संकटाला तोंड देत असतानाच बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीची थट्टा उडवली होती. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबतही त्यांनी अवमानजनक वक्तव्य केलं होतं. या विधानांवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या बाबा रामदेव यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. “ज्या लोकांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती. त्या लोकही योग आणि घरगुती उपचाराने बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज पडली नाही, असं डॉ. गुलेरिया म्हणालेत. मी म्हणतो की, ९५ ते ९८ टक्के लोकांवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही. हे सगळं आयुर्वेद आणि योगामुळे घडलं,” असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.

sharad pawar slams amit shah over knowledge about agriculture
‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला
bmc 1400 crores cleaning contract case
१४०० कोटींचे कंत्राट प्रकरण: महापालिकेकडून सरकारी धोरणाचे उल्लंघन केले जात असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची विचारणा
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

याच मुद्द्यावरून त्यांना ‘मग केंद्र सरकारने करोना औषधांच्या किटमध्ये कोरोनीलचा समावेश का केला नाही?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले,”हा आमचा दोष नाही, तो सरकारच्या धोरणांचा दोष आहे. तुम्ही हे आमच्यावर का लादता? तुम्ही देशातील कोणत्याही शहरात जाऊन बघा, १०० पैकी ९० रुग्ण योग, प्राणायाम आणि आयुर्वेदीक उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. मग असं कसं म्हणता की अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती व डॉक्टरांनीच लोकांचे जीव वाचवलेत? अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण गमावून रुग्णांचे जीव वाचवले. त्यांचे आभारच. अशा संकटाच्या काळात त्यांना मदत करायलाच हवी ना, नाहीतर वैद्यकीय विज्ञानाला काय अर्थ राहिल,” असं बाबा रामदेव म्हणाले.

“मी हे मान्य करतो की, करोनाच्या संसर्गामुळे प्रकृती गंभीर झालेल्या १० टक्के लोकांचे जीव डॉक्टरांनी वाचवले. पण, ९० टक्के लोकांचे जीव आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारांनी वाचवले आहेत. मग माझ्या बोलण्यावर डॉक्टरांचा आक्षेप का आहे? कारण त्यांचा व्यवसाय याच्याशी संबंधित आहे. पण, ते ताकदीच्या जोरावर सत्य लपवू शकत नाहीत. मी अ‍ॅलोपॅथीचा विरोधक नाहीये. अत्यावश्यक प्रसंगी उपचार करण्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड काम केलं आहे. पण, लाईफस्टाईलमुळे निर्माण होत असलेल्या आजारांवर त्यांच्याकडे कोणताही उपाय नाही,” असं बाबा रामदेव म्हणाले.