सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीची किंमत आता १०० रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी ही लस राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळत होती. आता ती ३०० रुपयांना मिळणार आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिरम इन्स्टिट्युटने काही दिवसांपूर्वीच लसीचे नवे दर जाहीर केले होते. यानुसार राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रति डोस अशी किंमत असून खासगी रुग्णालयांसाठी हीच लस ६०० रुपयांना असणार अशी माहिती देण्यात आली होती. आता सिरमने नवे दर जाहीर केले असून या नव्या दरानुसार, राज्य सरकारांना ही लस ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांना या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे ६०० रुपयेच मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, देशात अनेक ठिकाणी लसींची कमतरता भासत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covishield vaccine new price declared by adar poonawala vsk
First published on: 28-04-2021 at 18:01 IST