पॉर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये हळू हळू जम बसवत असलेली सनी लिओनी पुन्हा एकदा वादात सापडली असून कम्युनिस्ट पक्षाचे नेते अतुलकुमार अंजन यांनी देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्यास सनीला जबाबदार धरले आहे. सनी लिओनीची कंडोमची जाहिरात देशातील बलात्काराच्या घटनांना कारणीभूत असल्याची मुक्ताफळे अतुलकुमार यांनी उधळली आहे.
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे आयोजित सभेत बोलताना अंजनकुमार यांनी सनीवर तोफ डागली. मी स्त्रीचा सन्मान करणाऱयांपैकी आहे. मात्र, सनी लिओनीच्या बाबतीत ते शक्य नाही. ती समाजात अश्लीलता पसरविण्याचे काम करते आहे आणि संस्कृती बिघडवणाऱया व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे सन्मान होता कामा नये, असे अंजनकुमार म्हणाले. सनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर अंजनकुमार यांचा आक्षेप आहे. माझा कंडोमला विरोध नाही तर सनी लिओनीला आहे. ही अशाप्रकारची जाहिरात टेलिव्हिजनवर दाखविलीच कशी जाते? याला जाहिरात म्हणतात का? अशा प्रश्नांची सरबत्तीच अंजन यांनी मांडली. सनीच्या जाहिरातींमुळे लैंगिकतेला उत्तेजना मिळत असून जबाबदारीची भावना संपुष्टात येत असल्याचे अंजनकुमार म्हणतात. एवढेच नाही तर ज्यांना सनीचा पुळका आहे त्यांनी आधी आपली आई, बहिण आणि मुलीला ही जाहिरात दाखवावी आणि मग बोलावे, असेही अंजनकुमार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cpis atul kumar anjan says sunny leones condom ad will increase rape
First published on: 03-09-2015 at 15:46 IST