सुरुवातीच्या काही पराभवानंतर भारताविरुद्धचा सामना गमावल्यावर पाकिस्तानचा संघ पेटून उठला. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा पाडाव करत पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवले. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ १९९२च्या विश्वचषक विजेतेपदाची पुनरावृत्ती करणार, अशी जोरदार चर्चा होती. पण भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या इंग्लंडच्या विजयामुळे न हरताच पाकिस्तानची १९९२ची पुनरावृत्ती खंडित झाली आहे, त्यामुळे समाजमाध्यमांवर चर्चेला ऊत आला आहे. ‘‘इतना गलत कैसे हो सकता है भाई, आता घोडय़ांच्या शर्यतीत गाढवे धावणार नाहीत,’’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत.