नियोजित विवाहसोहळ्यासाठी साड्या खरेदी करायच्या असून, तू मला भेट, असा मेसेज करून त्याने होणाऱ्या बायकोला बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिचा मृतदेहच रस्त्याकडेला सापडला. ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये. पती जितीनने होणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं आता समोर आलं असून, खून करण्यामागच्या कारणाचाही उलगडा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीना आणि जितीन यांचं लग्न जमलं होतं. त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी टीनाला जितीनने (होणारा पती) कॉल केला. लग्नासाठी साड्या खरेदी करायच्या असून, मला तू भेट, असं जितीनने टीनाला सांगितलं. त्यानंतर टीनाला तिच्या आईने जवळच्या बसस्थानकापर्यंत सोडलं. सकाळी ११ वाजेच्या सुमारास टीनाला तिच्या आईनं सोडलं होतं, अशी माहिती लग्नासाठी आलेल्या टीनाचा नातेवाईक विपीन याने दिली.

हेही वाचा- अश्लील व्हिडिओ बनवून Blackmail करणारी टोळी ताब्यात, सुंदर मुलींच्या फेक अकाऊंटची घ्यायचे मदत

जितीन दुपारी घरी आला, मात्र टीना कुठेही दिसत नव्हती. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण तिचा ठिकाणा सापडत नव्हता. त्यानंतर दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पोलिसांना एका गावाजवळ रस्त्याच्या कडेला पडलेला टीनाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांनी टीनाच्या घरी दिली. जितीनला भेटायला गेलेली टीना काही तासानंतर मृतावस्थेत सापडली, असं कुटुंबियांनी सांगितलं.

हेही वाचा- दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! आई आणि पाच वर्षाच्या मुलाच्या हत्येने खळबळ; पती बेपत्ता असल्याने गूढ वाढलं

टीनाचा मृतदेह कुटुंबियांनी ओळखल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी जितीनला अटक केली. जितीनला टीनाशी लग्न करायचं नव्हतं त्यामुळे जितीनने तिची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. टीना आणि जितीन यांचा प्रेमविवाह होता आणि जितीनला लग्न करायचंच नव्हतं, तर त्याने लग्नास नकार द्यायचा होता, असं टीनाच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news police fiance kills woman uttar pradesh up police bmh
First published on: 16-06-2021 at 14:04 IST