‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले.  हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली.

सोमवारी सकाळपासून निशिकांत यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र त्यावेळी ते व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं. आता दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘निशिकांत कामत यांना ३१ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून ते लिव्हर सिरॉसिस Liver Cirrhosis या आजाराचा सामना करत होते. आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला’, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली. ‘मित्रा, तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत रितेशने भावना व्यक्त केल्या.