Dalit man burnt alive in womens clothes Crime News : उत्तर गुजरात येथून हत्येची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक तरूण विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराने एका ५६ वर्षीय दलित व्यक्तीला जिवंत जाळल्याची प्रकार समोर आला आहे. या महिलेने घरच्यांपासून सुटका करून घेण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी ही हत्या केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला जाती-जातींमधील वादातून ही हत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. पण पोलीसांच्या चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पाटण पोलिसांनी बानासकांठा जिल्ह्यातील पालनपूर रेल्वे स्टेशन येथून २२ वर्षीय गीता आणि तिचा प्रियकर भरत लुभा अहिर याला अटक केली आहे. वाउवा गावातील एका मजुरी करणारा व्यक्ती हारजी देभा सोलंकी यांच्या हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांना अटक करण्यात आली. या जोडप्याकडे राजस्थानच्या जोधपूरचे तिकीट देखील आढळून आले आहे.
२७ मे च्या सकाळी एक अर्धवट जळालेला मृतदेह पाटण जिल्ह्यातील सतंलपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील जाखोत्रा गावात आढळूव आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला जेव्हा. हा मृतदेह हा नारंगी एम्ब्रॉयडरी असलेल्या ब्लाउज आणि निळा घागरा घातलेल्या अवस्थेत होता. तसेच मृतदेहाच्या पायात पैंजण असल्याने गावकऱ्यांचा हा मृतदेह एका महिलेचा असल्याचा समज झाला
दरम्यान ज्या व्यक्तीला हा मृतदेह आढळून आला त्या सुरेश गेंगा भीमा अहिर यांनी सांगितले, की त्यांची २२ वर्षीय पत्नी गीता ही गेल्या रात्री रात्री ११ वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे . तसेच त्याने मृतदेहाने घातलेले कपडे हे तिच्या कपड्याशी जुळत असल्याचेही सांगितले, त्यानंतर सर्वांचा संशय आणखिनच बळावला.
मात्र काही काळासाठी विचारात पडलेल्या पोलिसांना लवकरच लक्षात आले की मृतदेह हा पुरुषाचा आहे. त्याच्यानंतर संतलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या पीडित व्यक्तीचा लहान भाऊ पंचा देभा सोलंकी यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर मृचदेह जीएमईआरएस धारपूर येथील सीव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला, जेथ शवविच्छेदनात पीडित व्यक्तीचा भाजल्याने झालेल्या जखमांमुले मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली.
तीन-चार महिन्यांपूर्वीच जुळलं होतं प्रेम
दरम्यान या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आले. गीता ही तीन ते चार महिन्यांपूर्वीच भारत याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दोघांनी मिळून एका पुरुषाच्या मृतदेहाला तिचे कपडे घालून तिच्या मृत्यूचे खोटं नाटक रचलं. तिच्या कुटुंबियांना तिचा मृत्यू झाल्याचा विश्वास बसावा आणि पळून जाऊन दुसरे आयुष्य सुरू करता यावे या उद्देशाने हा भीषण प्रकार करण्यात आला होता.
अनेक गावात शोध घेतला
पाटणचे एसपी व्ही के नायी यांनी सांगितले की, वृद्ध आणि कमकुवत असलेल्या हरजी सोलंकी यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र यापूर्वी आरोपी भारत याने अनेक गावांमध्ये संभावित पीडित व्यक्तीचा शोध घेतला होता. ज्यामध्ये बारारा, दात्राना, संतलपूर आणि माधूत्रा या गावांचा समावेश होता. नायी पुढे म्हणाले की, “भारतने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ते त्राण नसलेले शरीर स्वत: त्याच्या नातेवाईकाच्या दुचाकीवर बांधले आणि ते घेऊन वाउवा गावातून तो जाखोत्रा गावात गेला, येथे त्याने रात्र होईपर्यंत त्यांना लपवून ठेवले.”
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी भरत याला त्या व्यक्तीला घेऊन जाताना पाहिले आणि जेव्हा त्याला याबद्दल विचारले असता त्याने सोलंकी हे अजारी असून त्यांना रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. रात्री गीता भरतकडे आली आणि दोघांनी मिळून सोलंकी यांना तिचे कपडे घातले आणि गीताच्या घराच्या जवळच त्यांच्यावर पेट्रेल ओतून पेटवून दिले.
गीताच्या पतीला त्यांच्या मुलाच्या रडण्याने जागा आली, त्याला त्याच्या पत्नीच्या कपड्यांमध्ये जळणारा मृतदेह दिसला, ज्यामुळे तात्काळ घबराट पसरली आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
जिवंत असतानाच पेटवून दिलं
शवविच्छेदन केल्यानंतर आढळून आले की पेटवून देण्यात आले तेव्हा सोलंकी हे जीवंत होते. त्यामुळे त्यांना जिवंत जाळण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. याबरबोबरच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी गीता ही कॅन भरून पेट्रोल घेऊन गेल्याची पुष्टी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेच पेट्रोल सोलंकी यांना पेटवून देण्यासाठी वापरण्यात आले.
पोलिसांनी गीता बेपत्ता झाल्याचा अधिक खोलात जाऊन तपास केला असता तिचे प्रेमप्रकरण समोर आले. त्यानंतर या जोडप्याच्या मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले. पालमपूर रेल्वे स्टेशनवर राजस्थानला निघण्याच्या तयारीत असलेल्या या दोघांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आले.