उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या मुलाने त्याच्या कोंबडीचा कथितपणे विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सिंदुरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या कोंबडीच्या मृत्यूनंतर माजी आमदाराच्या मुलाने पोलीस ठाण्यात ‘खुनाचा’ गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदाराच्या मुलाने आरोप केला की त्याच्या कोंबडीला विष देण्यात आलं आहे आणि त्यामुळे कोंबडीचे पोस्टमॉर्टम करण्यात यावे.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, तक्रारदार राजकुमार भारती हे पिपारा कल्याण गावाचे माजी आमदार दुखी प्रसाद यांचे पुत्र आहेत. राजकुमार भारती यांनी त्यांच्या कुटुंबाला प्राणी आणि पक्षी खूप आवडतात असे म्हटले आहे. भारती यांनी आरोप केला आहे की ते काही कामासाठी महाराजगंजला गेले होते आणि त्यांचा मुलगा विकास शाळेत गेला होता. जेव्हा विकास घरी परतला तेव्हा त्याला आढळले की त्यांची कोंबडी श्वास घेऊ शकत नव्हती आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
माध्यमांच्या अहवालानुसार असा दावा करण्यात आला आहे की, माजी आमदाराच्या मुलालाच्या कोंबडीला कोणीतरी विष दिले आहे असा संशय आहे. तर राजकुमार भारती यांनी कोंबडीचे शवविच्छेदन करण्याची मागणीही केली आहे.
सिंदूरिया पोलीस स्टेशनचे एसएचओ ऋतुराज सुमन यादव यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे असून ते तपास करत आहेत असे सांगितले. मात्र, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात सर्वजण अवाक झाले आहेत.