त्या 8 लाख रूपयांनी त्याला बरंच काही करता आलं असतं. त्याच्यावर असलेलं कर्ज तर फिटलंच असतंच पण त्याच्या आईवडिलांना असलेल्या बरेच प्रश्नही सुटले असते. पण त्याने त्याच्या टॅक्सीत राहिलेली प्रवाशाची बॅग त्याने त्या ग्राहकाला परत केली.
२२ वर्षांच्या देवेंद्र कापरी नवी दिल्ल्लीत टॅक्सी चालवण्याचं काम करतो. ती टॅक्सीही त्याची नाही. त्याच्या बहिणींचं लग्न करण्यासाठी त्याच्या वडिलांनी चक्रवाढ व्याजाने १ लाखाचं कर्ज काढलं. गरीब शेतकरी कुटुंब असल्याने हे कर्जाच्या व्याजाची रक्कमही फेडण्याची त्यांची एेपत नव्हती. ते कर्ज फेडण्यासाठी त्याच्या वडिलांनी होता नव्हता तोही जमिनीचा तुकडा विकला पण तरीही चक्रवाढ व्याजाने १ लाखाचं कर्ज दोन वर्षांत २ लाखांचं झालं. आता कर्ज फेडण्यासाठी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. तेव्हा शाळेत असलेल्या देवेंद्रला त्याची अभ्यासाची पुस्तकं बाजूला ठेवत काम शोधत हिंडावं लागलं. त्यासाठी तो दिल्लीमध्ये आला. आणि गाड्या साफ करणाऱ्याची नोकरी त्याने पकडली. कालांतरान त्याने कार ड्रायव्हिंगही शिकून घेतलं आणि दुसऱ्याची एक गाडी तो चालवायला लागला.
एका दिवशी त्याला दिल्लीच्या विमानतळावर एका ग्राहकाला सोडून आल्यावर तो ग्राहक त्याची बॅग विसरल्याचं त्याला आढळलं. त्या बॅगमध्ये परकीयय चलन, दागिने असा ८ लाखांचा एेवज होता. पण देवेंद्रने प्रामाणिकपणाने ती बॅग एअरपोर्टवरच्या पोलिस चौकीत जमा केली. ती बॅग ज्याची होती त्याला परत देण्यात आली.
आपल्याला कष्टानेच पैसे मिळवायचे आहेत असं त्याचं म्हणणं आहे आणि ती भावना त्याने त्याच्या प्रामाणिक कृतीनेच दाखवून दिलं