पीटीआय, नवी दिल्ली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास, भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुसज्ज, सक्षम आणि तयार आहेत.पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरचा सुमारे चार वर्षांचा सीमावाद आणि हिंदी महासागरात चिनी सैन्याच्या प्रवेशाबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. एका संरक्षण परिषदेत ते बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भारताची संरक्षण यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘भारतीयतेच्या भावनेने’ ती मजबूत करण्यावर भर देत आहे,’ असे सांगत सिंह यांनी सध्याच्या आणि पूर्वीच्या सरकारमधील मुख्य फरक म्हणून दृष्टिकोनाचे वर्णन केले. ‘सध्याचे सरकार भारतातील लोकांच्या क्षमतेवर ठाम विश्वास ठेवते, तर पूर्वी सत्तेत असलेले लोक त्यांच्या क्षमतेबद्दल काहीसे साशंक होते. आज केंद्रातील शक्तिशाली नेतृत्वामुळे आपल्या सैन्यात प्रबळ इच्छाशक्ती आहे. सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने काम करत आहोत.’