जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. सुरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi and mumbai ranked among worlds safest cities hrc
First published on: 04-09-2021 at 14:55 IST