दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
– दिल्लीत आजपासून आचारसंहित लागू
– २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे
– निवडणुकीसाठी १४ जानेवारी रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाईल
– उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारी अंतिम तारीख
– ८ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.
– ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल
– अॅपच्या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन केलेल्या तक्रारींची नोंद घेतली जाईल
– निवडणुकीत १,४६,९२,१३६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील
– निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ९० हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे
– २६८९ जागांवर एकूण १३७५० मतदान केंद्र असणार आहेत

दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी असणार आहेत. भाजपाने मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दिल्लीच्या निवडणुकीत यावेळी सुधारित नागरिक्तव कायदा आणि जेएनयू हिंसाचार दोन महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. एकीकडे भाजपा आक्रमकतेने मुद्दे मांडत असताना आम आदमी पक्ष मात्र सांभाळून पावलं उचलत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi assembly election dates announced election commission aap congress bjp sgy
First published on: 06-01-2020 at 15:50 IST