देशात संसर्गजन्य आजार पाठ सोडायला तयार नाही आहेत. करोना विषाणू, मंक्सीपॉक्सनंतर आता आणखी एका आजाराने जनावरांना बाधित करायला सुरुवात केली आहे. ‘लंपी स्किन डिसीज’ असे या आजाराचे नाव आहे. त्वचेशी संबंधित असणाऱ्या या आजारामुळे गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच दिल्लीतही धुमाकूळ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

लम्पी स्किन आजाराचा वाढता प्रादूर्भाव पाहता दिल्लीचे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री गोपाय राय यांनी संबंधित विभागांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्राण्यांचे लम्पी स्किन आजारापासून संरक्षण, त्याचं लसीकरण आणि आजार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.

कसा पसरतो जनवारांमध्ये आजार?

हा आजार एका विषाणूमुळे जनावरांमध्ये परसतो. ज्याला ‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’ (LSDV) म्हणतात. त्याच्या तीन प्रजाती आहेत. ज्यामध्ये पहिली प्रजाती ‘कॅप्रीपोक्सव्हायरस’ आहे. त्यानंतर गोटपॉक्स व्हायरस आणि मेंढीपॉक्स व्हायरस अशा आणखी दोन प्रजाती आहेत.

हेही वाचा – दिल्लीत ‘लम्पी स्किन’ आजाराने प्रशासनाची चिंता वाढवली, सरकारने बोलावली तातडीची बैठक

या आजाराची लक्षणे कोणती?

या आजाराची अनेक लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये ताप, वजन कमी होणे, लाळ वाहणे, डोळे व नाकातून पाणी येणे, कमी दूध येणे, शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दिसतात. यासोबतच या आजारात शरीरात गाठीही तयार होतात. सोबतच यामुळे मादी गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, पांगळेपणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही दिसून आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.