scorecardresearch

Delhi Murder Case : “एकत्र जगू शकत नाही, मग…”, निक्कीने साहिलसमोर ठेवल्या होत्या ‘या’ तीन अटी; पण…

साहिल आणि निक्कीत कडाक्याचं भांडण झालं होतं, अन्..

nikki sahil
"एकत्र जगू शकत नाही, मग…", निक्कीने साहिल समोर ठेवल्या होत्या 'या' तीन अटी; पण…

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजं आहे. अशातच आणखी एका घटनेने दिल्ली हादरली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका ढाब्यातील फ्रीजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. याच प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे.

निक्की यादव, असे खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. तर, साहिल गेहलोत असं आरोपी तरुणाचं नाव आहे. निक्की आणि साहिल ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. पण, साहिलचं दुसऱ्या तरुणीशी कुटुंबियांनी लग्न ठरवलं होतं. याचा विरोध केल्याने साहिलने निक्कीचा गळा आवळून खून केलाचं तपासात समोर आलं.

हेही वाचा : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती! दिल्लीत गर्लफ्रेंडचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला, अन्…

मात्र, साहिलचं लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर निक्कीनं त्याच्यासमोर तीन पर्याय ठेवले होते. ‘एकतर माझ्याशी लग्न कर, दुसरं कुटुंबियांनी जमवलेले लग्न तोडून टाक अथवा आपण दोघेही एकत्र जीव देऊ,’ असे पर्याय निक्कीने साहिल समोर ठेवलेले. यावर साहिल म्हणाला की, ‘यातील एकही गोष्ट करण्यात तयार नाही.’ यानंतर दोघांमध्ये जोरदार वादा झाला होता.

हेही वाचा : तीन वर्षात १.१२ लाख मजूरांची आत्महत्या; तर महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या आत्महत्येचा आकडा काळजीत टाकणारा

आधी निक्कीचा खून केला अन्…

लग्नावरून साहिल आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणानंतर साहिलने कश्मीरी गेट आयएसबीटी जवळ निक्की यादवचा खून केला. साहिलने मोबाईलच्या डेटा केबलने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री निक्काचा गळा आवळला. निक्कीचा खून केल्यावर त्याने तिचा मृतदेह मित्राऊ गावात नेला. तिथे बंद एका ढाब्यातील फ्रीजमध्ये साहिलने निक्कीचा मृतदेह ठेवून दिला. यानंतर १० फेब्रुवारीला साहिलने कुटुंबियांनी जमवलेल्या तरुणीशी लग्न केलं.

दरम्यान, पोलिसांना एका ढाब्यात मृतदेह ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत साहिल गेहलोतला अटक केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 14:10 IST
ताज्या बातम्या