दिल्लीमधील ‘जंतरमंतर’वर जमावाच्या उपस्थितीत प्रक्षोभक घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कलम १५३-ए अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जंतरमंतर आयोजित एका आंदोलना दरम्यान एका विशिष्ट समजाविरुद्ध प्रक्षोभक घोषणबाजी करण्यात आल्याप्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आयोजकांना रॅलीसाठी परवानगी नव्हती आणि त्यांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे केल्याप्रकरणी संबंधित डीडीएमए अधिनियम उल्लंघनासाठी १८८ आणि ५१ कलमं जोडली आहेत.

रॅलीला सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि दिल्ली भाजपाचे माजी प्रवक्ते आश्विनी उपाध्याय यांनी या रॅलीचे आवाहन केले होते. सोमवारी सकाळी उपाध्याय यांनी दिल्ली पोलिसांना मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये म्हटले होते की काही लोकांनी त्यांच्या कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि दुपारी १२.१५ वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ते कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. डीसीपी दीपक यादव म्हणाले, कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.