निर्भया बलात्कार घटनेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या विधानानंतर दिल्ली महिला आयोगाने ‘बलात्कार आरोपींसारखी भाषा वापरणे बंद करा’, असं म्हणत गेहलोतांना फटकारले आहे. तसेच निर्भयाच्या आईने गेहलोतांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
काय म्हणाले होते गेहलोत?
“निर्भया प्रकरणानंतर दोषींना फाशीचा कायदा आला. त्यामुळे बलात्कारानंतर खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि हे चित्र देशासाठी चिंतादायक असल्याचे” विधान अशोक गेहलोतांनी केलं होतं. या विधानानंतर भाजपाने मोठ्या प्रमाणात त्यांवर टीका केली आहे. या विधनाच्या माध्यमातून गेहलोत यांनी बलात्कारी आरोपींन नाही तर काद्याला दोष दिला असल्याचा आरोप भाजपा प्रवक्त शहजाद जयहिंद यांनी केला आहे.
बलात्कार घटनांच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार राजस्थानमध्ये २०२० मध्ये ५,३१० बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर एनसीआरबी नुसार वर्षभरापूर्वी २०१९ येथे बलात्काराचे ५,९९७ गुन्हे नोंदवले गेले होते. या दोन्ही वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये राजस्थान देशात पहिल्या क्रमांकावर होते.
हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानमधील बहिणीने भावासाठी यंदाही पाठवली राखी; म्हणाल्या, “२०२४ मध्ये…”
उत्तर प्रदेश दुसऱ्या तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर
१६ मार्च २०२२ रोजी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार यापैकी ४५.४ टक्के प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे. २,७६९ प्रकरणांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये ७०.९% प्रकरणांमध्ये शिक्षा झाली. २,३३९ प्रकरणांसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे ३३.८ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे.