Delta Airlines’ Boeing 767 flight engine catches fire video : डेल्टा एअरलाइन्सच्या अटलांटा येथे जाणाऱ्या विमानाला लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (LAX) शुक्रवारी आपत्कालिन लँडिंग करावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉस एंजेलिस येथून उड्डाण केल्याबरोबर याच्या एका इंजिनला आग लागल्याने हे विमान तात्काळ जमिनीवर उतरावे लागले.

या घटनैचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. डेल्टा एअरलाइनकडून चालवली जाणारी फ्लाइट ४४६, बोइंग ७६७-४०० विमान लॉस एंजेलिस विमातळावरून झेपावत असताना त्याच्या डाव्या बाजूच्या इंजिनध्ये आग लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विमानतळावर सुरक्षित परतण्याच्याआधी विमान लॉस एंजेलिस शहरावर गोल फिरताना पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या घटनेत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही. विमानाने आपत्कालीन लँडिंग केल्याने, ते उतरचाच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. हे विमान हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते.

डेल्टा एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. डेल्टा फ्लाइट ४४६ हे उड्डान केल्यानंतर विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड आढळून आल्यानंतर लगेचच लॉस एंजेलिस येथे परतले. विमान कंपनीने सांगितले की ते या घटनेच्या चौकशीत आणि सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल ते पूर्ण सहकार्य करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकन विमान वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन(FAA)ने आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की डाव्या इंजिनमध्ये नेमकी आग का लागली याची चौकशी केली जात आहे.