कोझिकोड/ नवी दिल्ली

उत्तर भारतात बहुतांश भागात पडलेल्या दाट धुक्यामुळे शेकडो प्रवाशांचे खूप हाल झाले. देशभरातील विविध विमानतळांवर ते अडकून पडले होते. त्यामुळे आबालवृद्धांसह, आजारी प्रवासी, तान्ही बालके, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक विमानांना तब्बल १२ तासांहून अधिक विलंब झाला.

हेही वाचा >>> ‘आई आणि मुलांच्या’ आक्षेपार्ह्य व्हिडीओ वरून युट्युबला तंबी! ‘अशा’ अकाउंट्सवर होणार कारवाई

अनेक विमानांचे मार्ग बदलले गेले, तसेच अनेक विमाने रद्द करण्यात आली. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे उत्तर भारतातील विमानसेवा प्रभावित झाली. परिणामी अन्य अनेक राज्यांमध्येही विमानसेवा विस्कळीत झाली. मंगळवारी विमानवाहतूक मोठया प्रमाणात विस्कळीत होती. सोमवारी सकाळी एकटया दिल्ली विमानतळावर किमान १६८ विमान उड्डाणांना विलंब झाला. सुमारे १०० विमाने रद्द झाली. नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्येवर चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातही प्रवासी हैराण

पुणे : पुणे विमानतळावरून सकाळी होणारी पाच उड्डाणे आणि येणारी सात विमाने रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल झाले. त्यातच विमान कंपन्यांकडून विमाने रद्द करण्याबाबत स्पष्ट सूचना न करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले. प्रवासी व विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये वाद होण्याचेही प्रसंग घडले. विमानतळावर प्रवाशांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.