हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबातील व्यक्तींना पुढील १० दिवसांसाठी सूतक असतं. या कालावधीमध्ये मृत व्यक्तीच्या घरातील व्यक्ती मंदिरांमध्ये जात नाही तसेच अनेक ठिकाणी देवाची पूजाही केली जात नाही. मात्र द्वादश ज्योर्तिलिंगांपैकी एक असणाऱ्या श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांपैकी एकाने हा नियम पाळला नसल्याचं समोर येत आहे. सूतक असतानाच १३ डिसेंबर रोजी विश्वानाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यानंतर गर्भगृहामधील एका पुजाऱ्याने सूतक असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा सांगितल्याची माहिती समोर आलीय. मंदिराशीसंबंधित पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचा विचार मंदिर प्रशासन करत असल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे.

प्रकरणाची सर्वत्र चर्चा…
पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असणाऱ्या काशी विश्वनाथ धामचं १३ डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आलं. हा प्रोजेक्ट आता नको त्या कारणासाठी चर्चेत आलाय. या प्रकल्पाची भव्यता किंवा तेथे उपलब्ध होणाऱ्या सुविधा या चर्चेचा विषय नसून येथील श्रीकांत मिश्रा नावाच्या पुजाऱ्यांने केलेल्या चुकीमुळे सध्या या प्रकल्पाची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा आहे.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

असा समोर आला सर्व प्रकार…
विश्वनाथ धाममधील लोकार्पण सोहळ्यानंतर पुजारी श्रीकांत मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींनी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये पूजा सांगितली. मात्र मिश्रा यांच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने त्यांना सूतक लागलं होतं अशी माहिती समोर येतेय. श्रीकांत यांचा पुतण्या वेद प्रकाश मिश्रा याचा ५ डिसेंबर रोजी रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच वेद प्रकाश मिश्रा याच्या तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर सर्व प्रकरण प्रकाशझोतात आलं आहे.

नक्की वाचा >> पंतप्रधानांची नवीन गाडी पाहिलीत का? जगातील सर्वात महागड्या Bulletproof गाडीतून प्रवास करतात मोदी, किंमत आहे…

मोदी, योगींकडे करण्यात आली तक्रार
घरात सूतक असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते पूजा सांगणाऱ्या या पुजाऱ्याविरोधात आता स्थानिकांनी उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केलीय. या प्रकरणाची सर्वात पाहिली तक्रार श्री काशी विश्वानाथ मंदिर न्याचे माजी सदस्य प्रदीप कुमार बजाज यांनी केलीय. बजाज यांनी सर्व पुरावे आणि कागदपत्रांसहीत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भातील लेखी तक्रार केलीय. बजाज यांनी केलेल्या दाव्यानुसार १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी विश्वनाथ धाममध्ये लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी मोदींनी बाबा विश्वनाथ येथे अभिषेक केला होता. बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारी श्रीकांत मिश्रा यांनीही पूजा सांगितलेली. मात्र श्रीकांत यांनी पूजा सांगितली तेव्हा त्यांना सूतक लागलं होतं.

नक्की वाचा >> अबब… तब्बल चार तास चालली पुतीन यांची प्रेस कॉन्फरन्स, सर्व प्रश्नांना दिली उत्तरं; भारतीयांना झाली मोदींची आठवण

कारवाईची मागणी…
श्रीकांत यांचा सख्ख्या पुतण्याचं मध्य प्रदेशमध्ये ५ डिसेंबर रोजी निधन झालं होतं. ६ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर दहा दिवस सूतक पाळलं जातं. त्यामुळे ६ डिसेंबपासून दहा दिवस मिश्रा यांना सूतक लागलं होतं. तरीही त्यांनी १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये पूजा सांगितली. मिश्रा यांनी ही पूजा सांगायला नको होती. मिश्रा यांनी सूतक असताना मंदिरामध्येही प्रवेश करायला नको होता असं बजाज म्हणालेत. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बजाज यांनी केलीय.

नक्की वाचा >> “…तर बिहारमध्ये येऊ नका”; दारुबंदीसंदर्भातील ‘त्या’ मागणीवरुन मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले

मंदिर प्रशासनाची भूमिका काय…
मंदिर प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरु केलाय. काशी विश्वानाथ मंदिराच्या विशेष कार्याधिकारी उमेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर प्रशासनाकडे या संदर्भातील तक्रार आली आहे. या प्रकरणामगील सत्य काय आहे याचा तपास मंदिर प्रशासन आपल्या स्तरावर करत असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये पुजारी मिश्रा यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. यासंदर्भात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाईचं आश्वासन मंदिर प्रशासनाने दिलंय.