Delhi CA Suicide: हल्ली तरूणांमध्ये नैराश्य येण्याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबाशी असलेला विसंवाद किंवा कार्यालयीन ठिकाणचा तणाव, स्पर्धात्मक आयुष्य, बदललेली जीवनशैली आणि त्यातून निर्माण झालेल्या महत्त्वाकांक्षा यामुळे तरूण पिढीवर तणाव दिसून येतो. यातून काहीजण आत्महत्येसारखे नको ते पाऊल उचलतात. दिल्ली येथे एका सीए असलेल्या तरुणाने आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. एअरबीएनबीवर फ्लॅट भाड्याने घेतला आणि हेलियम वायू श्वासोच्छवासाद्वारे घेत तरूणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्याग्रस्त तरूणाचे नाव धीरज कंसल असे आहे. त्याने २० जुलै ते २८ जुलै असा दिवसांसाठी दिल्लीत फ्लॅट भाड्याने घेतला होता. तसेच इंडियामार्टद्वारे गाझियाबादवरून ३,५०० रुपयांत हेलियम गॅस विकत घेतला होता.

जीवन संपविण्याआधी कंसलने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात त्याने म्हटले, “मृत्यू हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर बाब आहे. माझ्या मृत्यूनंतर कृपया कुणी दुःखी होऊ नका. आत्महत्या करणे चुकीचे नाही, कारण माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही.”

माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही धीरजने पोस्टमध्ये लिहिले. “हा माझा एकट्याचा निर्णय आहे. माझ्या आयुष्यात मी ज्यांना ज्यांना भेटलो, तो प्रत्येकजण खास होता. त्यामुळे मी सरकार आणि पोलिसांना विनंती करेन की, माझ्या आत्महत्येनंतर कुणालाही जबाबदार न धरता त्रास देऊ नये”, असेही कंसलने लिहिले.

या पृथ्वीवर पुन्हा जन्म नको

आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे कोणताही पश्चाताप होत नसल्याचे धीरजने लिहिले. “हा माझा निर्णय आहे. माझे आयुष्य, माझे नियम”, असे लिहिताना धीरज म्हणतो की, माझे अस्तित्वच इथे क्षणभंगूर होते. मला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यायचा नाही. मला माझ्या स्वतःचाच राग येत आहे. माझ्यासारखा मीच मूर्ख असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी हब हिंजवडीमध्येही एका २३ वर्षीय आयटी इंजिनिरने कंपनीच्या इमारतीमधून उडी घेत आत्महत्या केली होती. पियुष अशोक कवडे या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्याने लिहिले, “मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. मला माफ करा.”