वाहतुकीचा नियम मोडला किंवा इतर तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी कोणतेही वाहन बाजूला घेतले की पहिल्यांदा त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. यामुळे प्रत्येक वाहनचालकाला ही कागदपत्रे जवळ बाळगूनच वाहन चालवावे लागत असे. पण आजपासून ही कागदपत्रे जवळ न बाळगताही वाहन चालवता येणार आहे. डिजिटल स्वरुपात ही कागदपत्रे वाहनचालकाजवळ असतील, तर त्याला ती सुद्धा पोलिसांना दाखवता येऊ शकतील. यासाठीच केंद्र सरकारकडून आज ‘डिजिलॉकर’ सुविधेची सुरुवात करण्यात येत आहे. डिजिलॉकरमध्ये ठेवलेली कागदपत्रे गरज पडल्यास पोलिसांना दाखवता येतील. त्यासाठी हे डिजिलॉकर वाहनचालकाच्या मोबाईललाही जोडले जाणार आहे.
वाहतूक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे या सुविधेची घोषणा केली होती. त्याची औपचारिक सुरुवात आजपासून होते आहे. आपला आधारकार्ड क्रमांक हा जर मोबाईल क्रमांकाशी जोडला असेल, तर या सुविधेचा वाहनचालक लगेचच फायदा घेऊ शकतील. त्यामुळे वाहनचालकांच्या मोबाईलमधूनच त्याच्याकडील लायसन्स आणि नोंदणीची कागदपत्रे पाहता येतील.
सध्या तेलंगणा आणि दिल्ली या दोन्ही राज्यांमध्ये ई-चलन पद्धतीची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये या सुविधेचा लगेचच फायदा घेता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digilocker facility available from today dont need to carry driving licence
First published on: 07-09-2016 at 13:18 IST