वीर सावरकरांनी गोमांस खाणे चुकीचे मानले नाही, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात म्हटले आहे. वीर सावरकर हे धार्मिक नव्हते असे आणि गायीला माता मानण्याची काय गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते असे दिग्विजय सिंह म्हणाले. गोमांस खाण्यातही अडचण येऊ नये, असे सावरकरांचे म्हणणे होते असेही ते म्हणाले. त्यांनी हिंदुत्व हा शब्द हिंदू अस्मिता रुजवावी म्हणून आणला होता आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हिंदुत्व या शब्दाचा सनातन हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सलमान खुर्शीद यांच्या अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी हे वक्तव्य केले. “माध्यमे हिंदुत्वाला हिंदू धर्माशी जोडतात याचे मला दुःख आहे. तर हिंदुत्वाचा हिंदू धर्म आणि सनातनी परंपरांशी काहीही संबंध नाही. सावरकर हे धार्मिक नव्हते. तुम्ही गायीला माता का मानता आणि गोमांस खाण्यावर त्यांचा काहीही आक्षेप नव्हता, असेही ते म्हणाले होते. हिंदू अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व हा शब्द आणला. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला,” असे दिग्विजय सिंह म्हणाले.
आरएसएसच्या प्रचार यंत्रणेमुळे हे घडले आहे. त्यांना पार करणे कोणालाही सोपे नाही. आता त्यांच्याकडे सोशल मीडियासारखे हत्यार आहे, असे ही दिग्विजय सिंह म्हणाले.
सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी उर्दूत गझल लिहिल्या आहेत – मोहन भागवत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सलमान खुर्शीद यांच्या या पुस्तकात अयोध्या वादावर समाजात फूट पडण्याची स्थिती सर्वोच्च न्यायालयाला आढळून आली आहे, असे म्हटले आहे. सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की हिंदुत्व सनातन आणि ऋषी-संतांचा प्राचीन हिंदू धर्म बाजूला ठेवत आहे.