एपी, तेल अविव

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करण्याचे काम सोपवलेले प्रभावी युद्ध मंत्रिमंडळ बरखास्त केल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सरकारमध्ये सामील झालेले विरोधी खासदार बेनी गँट्झ सरकारमधून बाहेर पडल्यानंतर हे मंत्रिमंडळ विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गँट्झ, नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री यौव गॅलन्ट युद्ध मंत्रिमंडळाचे सदस्य होते. त्यांनी संपूर्ण युद्धात एकत्रपणे महत्त्वाचे निर्णय घेतले. नेतान्याहू त्यांच्या काही सरकारी सदस्यांसह संवेदनशील मुद्दय़ांसाठी छोटे मंत्रिमंडळ स्थापन करण्याची शक्यता होती, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. नेतान्याहू यांचे दीर्घकाळ राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले गँट्झ हमासने दक्षिण इस्रायलवर ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर सरकारमध्ये सहभागी झाले होते. परंतु नेतान्याहू सरकारमधील अतिउजव्या खासदारांना बाजूला करण्यासाठी एक लहान मंत्रिमंडळ स्थापन करण्याची मागणी गँट्झ यांनी केली होती. यानंतर नेतान्याहू यांच्या युद्धाच्या हाताळणीत दोष दाखवून त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा >>>बायडेन यांची ट्रम्पविरोधात जाहिरात मोहीम; पहिल्या चर्चेपूर्वी ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेतान्याहू यांच्या युद्धकाळातील निर्णय घेण्यावर त्यांच्या सरकारमधील अतिराष्ट्रवादी लोकांचा प्रभाव पडला. त्यामुळे ते ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम आणतील. त्यांनी गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी नागरिकांचे स्थलांतर आणि हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यास समर्थन दिल्याचे काही समिक्षकांचे म्हणणे आहे. परंतु नेतान्याहू यांनी हे आरोप फेटाळून लावत माझ्या मनात देशाचे हित असल्याचे स्पष्ट केले.