राजस्थानमधील जोधपूर येथे भाजपाच्या एका रॅलीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोरच भाजपाचे नेते भिडल्याचं पाहायला मिळालं. या रॅलीत भाजपाच्या नेत्यांनी माजी आमदाराच्या हातातून माईक घेत त्याला बोलण्यापासून रोखलं. त्यानंतर या नेत्यांमध्ये माईकची ओढाओढ झाली. त्यात माईक स्टँडपासून वेगळा झाला. या वादात राजनाथ सिंह यांनाही हस्तक्षेप करावा लागला. यानंतर राजस्थान भाजपामधील गटबाजीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं काय घडलं?

राजस्थान भाजपाने जोधपूरमध्ये लोकसभा रॅलीचे आयोजन केले. याला देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राजस्थान विरोधी पक्षनेते सतीश पुनिया यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मंचावर राजनाथ सिंह यांच्याबरोबर बसलेले भाजपाचे एक माजी आमदार बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र, यानंतर काही भाजपा नेत्यांनी त्यांच्या हातातून माईक काढून घेत त्यांना खाली बसण्यास सांगितलं.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

भाजपा नेत्यांमध्ये माईकची ओढाओढ

या माजी आमदाराने मी राजनाथ सिंह यांची परवानगी घेतली आहे. केवळ पाच मिनिटे बोलू द्या, अशी विनंती केली. मात्र, इतर भाजपा नेत्यांनी राजनाथ सिंह यांना पुढे जाण्यासाठी उशीर झाल्याचं सांगत या माजी आमदाराला बोलण्यास विरोध केला. मात्र, यानंतरही हे माजी आमदार खाली बसण्यास तयार नव्हते. त्यानंतर भाजपा नेत्यांमध्ये माईकची ओढाओढ झाली. त्यात माईक स्टँडपासून वेगळा झाला.

वादात राजनाथ सिंह यांनाही हस्तक्षेप करावा लागला

याचवेळी एका भाजपा नेत्यांने मंचावर येऊन माईक ताब्यात घेतला आणि त्याला पुन्हा स्टँडला जोडलं. तसेच अन्य एका भाजपा नेत्याने माजी आमदाराची पाच मिनिटे बोलू देण्याची विनंती फेटाळत थेट राजनाथ सिंह यांनाच बोलण्याची विनंती केली. या वादात राजनाथ सिंह यांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी या भाजपा नेत्यांना शांतता राखण्यास सांगितलं.

काँग्रेसचे नेते श्रीनिवास व्ही. बी. यांनी राजस्थान भाजपा नेत्यांच्या वादाचा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे. तसेच भाजपामधील हा वाद किती माध्यमांनी दाखवला असा सवाल केला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : राहुल गांधींचा ‘खोटा’ व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी भाजपाच्या अमित मालवीयांविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल

दरम्यान, राजस्थान भाजपा नेत्यांच्या या वादानंतर पक्षातील गटबाजीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. आधीपासूनच राजस्थान भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच हा वाद उफाळल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.