Bharat Ratna Awards 2024 : काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. या पुरस्काराच्या घोषणेनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही या पुरस्काराप्रती आनंद व्यक्त केला आहे. मात्र, यावेळी त्यांनी एक महत्त्वाची मागणीही केली आहे.

“विद्यमान भाजपा सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केलेल्या सर्व व्यक्तिमत्त्वांचे स्वागत आहे. परंतु या प्रकरणात विशेषतः दलित व्यक्तिमत्त्वांचा अनादर आणि दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही. सरकारने याकडेही नक्कीच लक्ष द्यावेठ, असं मायावती म्हणाल्या आहेत.

bangladesh objection on mamata banerjee remark
“ममता बॅनर्जींबाबत आमच्या मनात आदर, पण त्यांनी…”; ‘त्या’ विधानानंतर बांगलादेशने व्यक्त केली नाराजी!
sanjay raut replied to amit shah
“आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
sushma andhare
“भाषण चुरचुरीत करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!
congress leader priyanka gandhi criticizes pm modi over job creation for youth
पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात; प्रियंका गांधी वढेरा यांची मागणी
rahul gandhi
“राजकारणात जय, पराजय होत असतो, पण…”; स्मृती इराणींना ट्रोल करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट!
jitendra awhad latest news
“शिंदे सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिला नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “मी अजित पवारांच्या…”
aditya thackeray replied to ashish shelar
तेजस ठाकरेंचा ‘त्या’ व्हिडीओवरून आशिष शेलारांची टीका; आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!

त्या पुढे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व्हीपी सिंह यांच्या सरकारने भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे आदरस्थान कांशीराम यांनी केलेला संघर्ष काही कमी नव्हता. त्यांनाही भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले?

सपा नेते अखिलेश यादव म्हणाले की, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक डॉ. एमएस स्वामीनाथन यांना प्रदीर्घ काळानंतर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले, प्रलंबित मागणी पूर्ण झाली. खरा आदर कोणत्याही व्यक्तीच्या तत्वांचा आणि संघर्षाचा आदर केल्याने होतो, मला आशा आहे की हे होईल.

हेही वाचा >> माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव

“एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला. देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली”, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

आणीबाणीच्या विरोधात चौधरी चरण सिंह लढले

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री किंवा साधे आमदार असतानाही त्यांनी केवळ राष्ट्र निर्माणाला महत्त्व दिले. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहिल.”

कृषी क्षेत्रात आधुनिकता आणणारे एम. एस. स्वामीनाथन

हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करत असताना मनस्वी आनंद वाटत आहे. अतिशय आव्हानात्मक काळात स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका वठवली. तसेच भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.”