पीटीआय, बंगळूरु

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांत सुमारे ९०० बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी बंगळूरु पोलिसांनी एका डॉक्टर आणि त्याच्या सहायक तंत्रज्ञाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.पोलिसांनी सांगितले, की डॉ. चंदन बल्लाळ आणि त्याचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ निसार यांनी म्हैसूर जिल्हा मुख्यालयातील एका रुग्णालयात केलेल्या प्रत्येक गर्भपातासाठी ३० हजार रुपये घेतले आहेत. रुग्णालय व्यवस्थापक मीना आणि कर्मचारी रिझमा खान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात, शिविलगे गौडा आणि नयन कुमार हे दोन आरोपी एका गर्भवती महिलेला मोटारीतून गर्भपातासाठी घेऊन जात होते. तेव्हा या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हैसूरजवळील मंडय़ा जिल्हा मुख्यालयात लिंगनिदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता.चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मंडय़ातील एका गुऱ्हाळात लिंगनिदान केंद्र चालवले जात होते. हे केंद्र चालवण्यासाठी संबंधितांकडे कोणतेही वैध प्रमाणपत्र किंवा अन्य अधिकृत दस्तावेज नव्हते. आरोपी डॉक्टरने गेल्या तीन वर्षांत त्याच्या साथीदारांच्या मदतीने म्हैसूर रुग्णालयात सुमारे ९०० अवैधरीत्या गर्भपात केले असे प्राथमिक तपासात उघड झाले  आहे. प्रत्येक गर्भपातासाठी तो ३० हजार रुपये आकारत असे.