scorecardresearch

शासकीय रुग्णालयात मेणबत्तीच्या आणि मोबाईलच्या प्रकाशात डॉक्टारांना करावी लागली महिलेची प्रसूती

आंध्र प्रदेशमधील रूग्णालयातील घटना; वीजपुरवठा खंडित झाल्याने रूग्णांचे हाल

आंध्र प्रदेशमध्ये वीज संकट वाढताना दिसत आहे. याचा प्रत्यत एका घटनेवरून आला आहे. आंध्र प्रदेशमधील नरसीपट्टणम येथील अनाकापल्ली जिल्ह्यातील एका शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी चक्क मोबाईलच्या आणि मेणबत्तीच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे. ही घटना ६ एप्रिल रोजी एनटीआर सरकारी रूग्णालयात घडली, जिथे जवळपास आठ तास वीज खंडित होती.

असाच एक रुग्णालयातील व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला अंधारात बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. तसेच, रुग्णालयात अंधारात रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाईक दिसत आहेत. याशिवाय, रुग्णालयामध्ये डासांचा देखील प्रादुर्भाव वाढलेला असल्याचे सांगितले गेले आहे. वीज नसल्याने रूग्णालयात प्रचंड गरम असल्याने पेपर, रूमाल इत्यादींच्या मदतीने हवा घ्यावे लागत आहे आणि डासांना पळवावे लागत असल्याचे सांगितले गेले.

हे एवढं मोठं रुग्णालय आहे तरीही इथे विजेसाठी काही बॅकअप सुविधा नाही. इथे जनरेटरही काम करत नाही, हे एक गॅस चेंबर सारखं आहे, मोकळी हवा येत नाही आणि डासांचे प्रमाण देखील खूप आहे. अशी प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाईकाने माध्यमांना दिली आहे. जवळपास आठ-दहा तास वीज नसल्याने रूग्णालताय तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना तसेच परत जावे लागले.

दरम्यान, विशाखापट्टणम येथील हॉस्पिटल सर्व्हिसेसचे जिल्हा समन्वयक रमेश किशोर, म्हणाले की अधिका-यांनी नरसीपट्टणम येथील रूग्णालयाशी संबंधित विशिष्ट घटनेची चौकशी केली होती.” रूग्णालयात काही तास डिझेल इन्व्हर्टर जनरेटरवर कार्यरत होते. मात्र बराच वेळ सुरू राहिल्यानंतर ते बंद झाले आणि डिझेलही उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही काळ वीज नव्हती. मात्र अशी परिस्थितीतही प्रसूती पूर्ण करण्यात पूर्ण करण्यात डॉक्टर यशस्वी झाले कारण त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग देखील नव्हता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी(७ एप्रिल) विशाखापट्टणम येथील तंत्रज्ञांनी भेट देऊन जनरेटर दुरुस्त केला. मी त्यांना आपत्कालीन वीज सुविधा उपलब्ध ठेवण्याचाही सल्ला दिला आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Doctors had to give birth to a child in a government hospital under the light of a candle and a mobile phone msr

ताज्या बातम्या