वॉशिंग्टन : जॉर्जियात २०२० च्या निवडणुकीत पराभवाच्या छायेत असताना निकाल फिरविण्यासाठी साटेलोटे केल्याच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ग्रॅँण्ड ज्युरींनी दोषारोपण केले आहे. ट्रम्प यांच्याविरुद्ध ठेवलेला हा चौथा गुन्हेगारी स्वरुपाचा आरोप आहे. ट्रम्प यांनी मात्र आपणास या प्रकरणात राजकीय हेतूने गोवण्यात आल्याचा दावा केला.