Donald Trump meeting with Putin over Ukraine : जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि रशिया यांचे राष्ट्राध्यक्ष लवकरच एकमेकांची भेट घण्याची शक्याता आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात बैठक होण्याबाबत सहमती झाली आहे, असे वृत्त असोसिएटेड प्रेस(AP) ने गुरूवारी क्रेमलिनच्या हवाल्याने दिले आहे.

पुतिन यांचे पररष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंकडून भेट निश्चित केली जाण्यासंबंधी काम सुरू आहे. या भेटीच्या ठिकाणाबद्दल एकवाक्यता झाली असून लवकरत ते जाहीर केले जाईल, एपीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतिन आणि त्यांच्यातील ही पहिलीच भेट असणार आहे.

असे असले तरी क्रेमलिनने गुरूवारी स्पष्ट केले आहे की, त्यांनी अमेरिकन अध्यक्षांचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकऑफ यांनी मॉस्को भेटीदरम्यान दिलेल्या पुतिन, ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय बैठकीच्या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

“क्रेमलिनमधील बैठकीत अमेरिकन प्रतिनिधी (स्टीव्ह विटकॉफ) यांनी या पर्यायाचा सहजपणे मांडला ,” असे क्रेमलिनचे सल्लागार युरी उशाकोव्ह म्हणाल्याचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS च्या हवाल्याने दिले आहे. “पण या पर्यायावर विशेष चर्चा झाली नाही. रशियाकडून या पर्याय कसलीही प्रतिक्रिया न देता सोडून देण्यात आला,” असे उशाकोव्ह म्हणाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी हे दोन नेत्यांच्या भेटीचे नियोजन केले जात आहे.

युक्रेन-रशिया यांच्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाले होते. या काळात रशियीने केलेल्या हल्ल्यात, युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार १२,००० हून अधिक युक्रेनियन नागरिक ठार झाले आहेत.

अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे अध्यक्षांची मॉस्को येथे भेट घेतल्यानंतर एका दिवसानंतरच पुतिन आणि ट्रम्प यांच्यात भेट होण्याची शक्यता असल्याचे जाहीर करण्यात आले होते.