Donald Trump Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता ट्रम्प यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ट्रम्प हे यूएई सरकारकडून मिळालेल्या भेटवस्तूवरून त्यांची निराशा उघडपणे व्यक्त करताना पाहायला मिळले. यूएईकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मुरबन या सर्वात प्रिमियम कच्च्या तेलाचा ( Murban crude oil) एक थेंब भेट म्हणून देण्यात आला. यानंतर ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे हातात ही भेटवस्तू घेऊन त्यांची निराशा व्यक्त करताना दिसत आहेत. ट्रम्प म्हणतात की, “हे पृथ्वीवरील सर्वात उच्च गुणवत्तेचे तेल आहे, आणि त्यांनी मला फक्त याचा एक थेंब दिला. यामुळे मी फार रोमांचित झालो नाही… पण एकही थेंबही न मिळण्यापेक्षा हे चांगले आहे.”

ट्रम्प जेव्हा असे म्हणाले त्या वेळी यूएईचे उद्योग मंत्री आणि एडनॉकचे सीईओ डॉक्टर सुल्तान अहमद अल जाबेर हे त्यांच्या बोलण्यावर हसत होते. तसेच ट्रम्प यांना मिष्कील पद्धतीने उत्तर देत ते म्हणाले की, “काळजी करू नका, जेथून हे तेल आले आहे तेथे अजून बरंच आहे.”

मुरबन तेल काय असतं?

मुरबन तेल हे उच्च गुणवत्तेचे तेल मानले जाते. हे युएईचे हलके, गोड कच्चे तेल आहे ज्यामध्ये सल्फरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे तेल रिफाइन करणे खूप स्वस्त पडते. हे तेल जेट फ्युएल, प्रिमियम गॅसोलिन आणि हाय ग्रेड डिझेल तयार करण्यासाठी चांगले मानले जाते. यूएई जवळपास दररोज १.६ दशलक्ष बॅलर निर्यात आणि २ दशलक्ष बॅरले उत्पादन करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य-पूर्वच्या यात्रेदरम्यान ट्रम्प यांना खूप महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. कतारच्या आमीरने ट्रम्प यांना ४०० मिलियन डॉलर्सचे बोइंग जेट गिफ्ट दिले आहे. या जेटमध्ये काही बदल करून ट्रम्प ते वापरू शकतात. दरम्यान ट्रम्प यांना मिळालेल्या या महागड्या भेटवस्तूवरून अमेरिकेच्या राजकारणत आरोप केले जात आहेत. डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनी या भेटवस्तू लाच असल्याचे म्हटले आहे. मात्र ट्रम्प यांनी त्याला उत्तर देत जर कोणी फ्रीमध्ये विमान देत असेल तर ते न स्वीकारने मूर्खता असेल असे म्हटले आहे.