Donald Trump Vs Emmanuel Macron: नियोजित वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच जी-७ शिखर परिषद सोडून अमेरिकेत परतलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ते इस्रायल-इराण यांच्यातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेत परतले नाहीत. जी-७ अर्धवट सोडून वॉशिंग्टनला परतण्यामागे खूप मोठे कारण असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रविरामाचा प्रस्ताव दिला होता, त्यामुळे ते अमेरिकेत परतल्याचे म्हटले होते. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या या दाव्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्रूथ सोशलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “प्रसिद्धी मिळवण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चुकून असे म्हटले की, मी कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेतून इस्रायल आणि इराणमधील शस्त्रविरामासाठी अमेरिकेला परतलो आहे. पण, हे चुकीचे आहे. मी आता वॉशिंग्टनला का आलो आहे, हे त्यांना माहित नाही. परंतु त्याचा शस्त्रविरामाशी निश्चितच काहीही संबंध नाही. त्याहूनही महत्त्वाचे, मुद्दाम असो वा नसो, इमॅन्युएल नेहमीच चूक करतात.”

तत्पूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दावा केला होता की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणला शस्त्रविरामाचा प्रस्ताव दिला आहे.

“खरोखरच भेटीचा आणि चर्चेचा प्रस्ताव आहे. विशेषतः शस्त्रविराम करण्यासाठी आणि नंतर व्यापक चर्चा सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. आता आपल्याला पहावे लागेल की, दोन्ही देश त्याचे पालन करतील का”, मॅक्रॉन यांनी जी-७ शिखर परिषदेत पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जी-७ शिखर परिषदेतून अचानक निघून आल्यानंतर सर्व नागरिकांना तेहरानमधून तात्काळ बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की इराणने अण्वस्त्र विकास रोखण्यासाठी करारावर स्वाक्षरी करायला हवी होती, सध्याची परिस्थिती “लज्जास्पद” आहे.