अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर या वर्षातील चौथा गुन्हा दाखल झाला असून पहिल्यांदाच ते अटकेच्या कारवाईला सामोरे गेले आहेत. जॉर्जियातील २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात गुरुवारी त्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे फुल्टन काऊंटी तुरुंग प्रशासनाने त्यांना अटक केली.

अटक केल्यानंतर इतर गुन्हेगारांप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगठ्याचे ठसे आणि फोटो घेण्यात आले. त्यानंतर २ लाख डॉलरच्या बॉन्डवर त्यांची तुरुंगातून सुटकाही झाली.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
bacchu kadu vs ravi rana
“मला अतिशय आनंद होतोय, राणांचा पैसा आणि खासदारकी…”, मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंची घणाघाती टीका
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून तुरुंगात काढलेला फोटो पोस्ट केला आहे. फुल्टन काऊंटी तुरुंगाने हा फोटो काढला असून डोनाल्ड ट्रम्प यांना P01135809 असा गुन्हेगारी क्रमांक देण्यात आला आहे. सुटाबुटात असलेले डोनाल्ड ट्रम्प फोटोमध्ये अत्यंत रागीट चेहऱ्याने पाहत आहेत. तुरुंगातील नोंदीनुसार, ६ फूट ३ इंच उंचीचे असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचं वजन ९७ किलो असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

तुरुंगातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांत ते तुरुंगातून बाहेर आले आणि अटलांटा विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मी काहीही चुकीचं केलं नसून ही न्यायाची फसवणूक आहे. अप्रामाणिक वाटत असलेल्या निवडणुकीला आव्हान देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.