अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्यांची व उताराची तीव्र भीती (फोबिया) असल्यामुळे इंग्लंड दौऱ्यादरम्यान पायऱ्यांचा वापर टाळण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्या चढण्याची भीती असल्याच्या बातम्या समोर आल्याने अशा प्रकारचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘दी संडे टाइम्स’ वृत्तपत्राने दिली आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजक सर्व कार्यक्रम इमारतींच्या तळमजल्यावर ठेवणार असून पायऱ्यांचा कमीत कमी वापर करणार आहेत. त्याचप्रमाणे ट्रम्प यांच्यासाठी विशेष मार्गिका तयार करण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्हाइट हाऊसला भेट दिली होती तेव्हा उतरणीवर ट्रम्प यांनी मे यांचा हात पकडल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर याबाबत बैठका झाल्या ज्यात ट्रम्प यांना पायऱ्या वापरणे आवडत नसल्याचे समोर आले आहे. दौऱ्यादरम्यान पायऱ्यांचा वापर पूर्णपणे टाळणे अशक्य असल्याने त्यांचा कमीत कमी वापर करण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्रानेदेखील ट्रम्प यांना पायऱ्या चढणे आवडत नसल्याची माहिती दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump visit to uk
First published on: 24-04-2017 at 03:06 IST