केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांचा बजाव करत सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन याने, “माझी आई कणखर होती आणि शशी थरूर तिला कोणत्याही प्रकारे अपाय करतीय यावर माझा विश्वास नाही” असे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांसाठी शिव मेनन यांच्यामार्फत त्यांच्या स्वाक्षरीने एक निवेदन प्रसिद्घ करण्यात आले आहे. यात शिव मेनन म्हणतात, शशी थरूर माझ्या आईला अपाय करू शकत नाहीत. त्यांच्यात मतभेद जरी असले तरी, प्रेमही होते. तसेच माझी आई कणखर होती ती आत्महत्या करू शकत नाही असेही शिव मेनन यांनी म्हटले आहे.
सुनंदा पुष्कर या तणावाखाली असल्याचे शिव मेनन यांनी मान्य केले आहे. त्याचबरोबर माझ्या आईच्या मृत्यूनंतर तिच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली निदान आता तरी, तिच्या आत्म्याला शांती मिळू द्या. काही प्रसारमाध्यमांमध्ये आईच्या मृत्यूबद्दल काही चूकीच्या आणि अतिरंजित बातम्याही छापून आल्या आहेत. असेही
मेनन यांनी निवेदनात म्हटले आहे.
सुनंदा पुष्कर यांचा शुक्रवारी नवी दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यू आधी शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात थरूर यांचे एका पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या कारणावरून घटस्फोट होण्याचे संकेत होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
माझी आई कणखर; शशी थरूर तिला अपाय करण्याची शक्यता नाही – शिव मेनन
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांचा बजाव करत सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन याने, "माझी आई कणखर होती आणि शशी थरूर तिला कोणत्याही प्रकारे अपाय करतीय यावर माझा विश्वास नाही" असे म्हटले आहे.
First published on: 22-01-2014 at 08:12 IST
TOPICSसुनंदा पुष्कर
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont believe shashi tharoor capable of harming my mother physically sunandas son