‘आय एॅम मलाला’ हे पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱया मलाला युसुफझईवरील पुस्तक विकण्याविरोधात तेहरिक-इ-तालिबान या दहशतवाद्यांच्या संघटनेने इशारा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मलालावरील हे पुस्तक विकणाऱयांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा तालिबानने दिला आहे.
मलाला युसुफझाईला अ‍ॅना पालित्कोव्हल्याका पुरस्कार
गेल्यावर्षी मलालावर तालिबान्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यातून बचावल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष मलालाकडे वेधले गेले. तालिबानने या पार्श्वभूमीवर संधी मिळताच तिच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा इशारा दिला असून तिने कोणतेही धाडसी कृत्य केले नसल्याचेही तालिबान्यांनी सांगितले आहे. मलालाने निधर्मवादासाठी इस्लामचा त्याग करून मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे तिला आता पुरस्कार दिले जात आहेत. तालिबान तिच्यावर हल्ला करण्याची कोणतीही संधी सोडणार नाही. असेही तालिबानी दहशतवाद्याने सांगितले आहे.
मला पाकिस्तानची पंतप्रधान व्हायचंय
मलालाने परत यावे – तालिबान्यांचे आवाहन