पाकिस्तानी टीव्हीवरील खासगी वाहिनीने हिंदू अल्पसंख्यांकांबाबत अतिशय अपमानजनकरित्या सादरीकरण केल्याने एका समालोचकाने वृत्तपत्रातील आपल्या लेखातून या वाहिनीची निंदा केली. जेव्हा कलाकार विनोद करताना हिंदूंचा अयोग्य प्रकारे उल्लेख करत होते, तेव्हा दर्शक जोरजोरात हसत होते, असे पाकिस्तानमधील ‘दी नेशन’ वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे. पाकिस्तानात लाखो हिंदू वास्तव्यास असताना या कार्यक्रमाच्या प्रसारणाला परवानगी कशी देण्यात आली, याबाबत लेखकाने चिंता व्यक्त केली. शाळेतील पुस्तकांपासून, टॉक शो आणि सर्वसाधारण जनतेत हिंदूंना अपवित्र अथवा हीन समजण्याची संस्कृती रुजली असल्याचे लेखात म्हटले आहे.
हास्य-विनोदासाठी हा घृणास्पद प्रकार जिवंत ठेवणाऱ्यांच्या आवडीस लेखकाने उपरोधाने धन्यवाद दिले आहेत. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी मुसलमानांबाबत घृणास्पद वक्तव्य केले तेव्हा नरकाच्या सर्व सीमा पार केल्याचेदेखील लेखकाने म्हटले आहे. अमेरिकेतील जातीयवाद्यांबाबात चिंता व्यक्त करण्यापेक्षा मुसलमानांच्या आगमनापूर्वी हजारो वर्षापासून या देशात राहाणाऱ्या लोकांबरोबर आपण काय करत आहोत, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे लेखात म्हटले आहे. आज जे पाकिस्तान आहे ते मुळात हिंदू संस्कृतीचे उगमस्थान असल्याचे या देशातील अनेकांना माहित नसल्याचे सांगत, हिंदू धर्मिय लोकांना सार्वजनिकरित्या अपमानित करणे हे अतिशय निंदनीय कृत्य असल्याचेदेखील लेखात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont target hindus says pakistani daily
First published on: 18-04-2016 at 17:34 IST