Double Suicide : मुलीच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईनेही आत्महत्या केल्याची घटना आता समोर आली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांताच आईनेही टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. बंगळुरु या ठिकाणी ही घटना घडली आहे. रचिता रेड्डी असं या ४८ वर्षीय महिलेचं नाव आहे.

नेमकी घटना काय घडली?

बंगळुरुत वास्तव्य करणाऱ्या श्रीजा रेड्डी या मुलीने आत्महत्या केली. आपल्या मुलीने आत्महत्या केली ही माहिती रचिता रेड्डी यांनी त्यांच्या पतीला तातडीने फोन करुन सांगितली. एवढंच नाही तर मी तिच्याशिवाय जगू शकत नाही असंही त्यांनी पती श्रीधर रेड्डी यांना सांगितलं. श्रीधर रेड्डी ऑफिसला गेले होते. ते तातडीने घरी निघाले. मात्र घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की श्रीजापाठोपाठ रचिता रेड्डी यांनीही आयुष्य संपवलं. पोलिसांनी ही माहिती दिली. साधारण १०. ४० च्या दरम्यान रचिता रेड्डी या त्यांच्या मुलीला नाश्ता देण्यासाठी तिच्या खोलीत गेल्या होत्या. त्यावेळी श्रीजाने आत्महत्या केल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर त्यांनी पती श्रीधर रेड्डींना ही माहिती दिली आणि ते घरी येईपर्यंत रचिता रेड्डींनीही आयुष्य संपवलं.

श्रीजाने आत्महत्या का केली याचा तपास सुरु आहे

श्रीजा एका कंपनीत डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करत होती. तिने आत्महत्या का केली? याची माहिती पोलीस घेत आहेत. तसंच मुलीशिवाय जगू शकत नाही म्हणत रचिता रेड्डी यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे श्रीधर रेड्डींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीजाची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे, ती तेलगु भाषेत आहे. या सुसाईड नोटमध्ये श्रीजाने एका मित्राचा उल्लेख केला आहे. मात्र आपल्या मृत्यूसाठी कुणालाच जबाबदार धरलं जाऊ नये असंही तिने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितलं?

एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की श्रीजा नैराश्यात होती त्यामुळे तिने आयुष्य संपवलं असावं असा अंदाज आहे. दरम्यान श्रीजा रोज उशिरापर्यंत जागत असे आणि सकाळी १० वाजता उठत असे. सोमवारी म्हणजेच १४ जुलैच्या दिवशी श्रीजा १०.३० पर्यंत खोलीतून बाहेर आली नाही. त्यामुळे तिची आई रचिता रेड्डी या तिच्यासाठी नाश्ता घेऊन खोलीत गेल्या. तिथे श्रीजाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी पाहिलं त्यानंतर त्यांनी नवऱ्याला फोन केला आणि नवरा ऑफिसमधून घरी येईपर्यंत आत्महत्या करुन आपलंही आयुष्य संपवलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरु आहे.